E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
दुसरीपर्यंत सीबीएसई देणार मातृभाषेतून शिक्षण
Wrutuja pandharpure
31 May 2025
पुणे
: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) देशभरातील संलग्न शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणात भाषा शिक्षणाचे स्वरूप बदलण्यासाठी एक निर्देश जारी केला आहे. सीबीएसई शाळा आता बालवाडीपासून इयत्ता दुसरीपर्यंत प्राथमिक भाषा किंवा शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषा किंवा राज्यभाषा वापरतील. हे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) २०२३ च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे.
मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, शिक्षणाची प्राथमिक भाषा ही विद्यार्थ्यांना सर्वात जास्त परिचित असलेली, शक्यतो मातृभाषा असावी. जिथे ते शक्य नसेल तिथे राज्यभाषा वापरली पाहिजे. विद्यार्थ्यांना दुसर्या भाषेत मूलभूत साक्षरता येईपर्यंत, ही भाषा सर्व विषयांसाठी शिक्षणाचे माध्यम म्हणून काम करेल.
महाराष्ट्रात, आतापर्यंत, बहुतेक सीबीएसई शाळांनी इंग्रजी हा शिक्षणाचा माध्यम म्हणून स्वीकारला होता आणि हिंदी ही दुसरी भाषा म्हणून शिकवली जात होती. तथापि, २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून, मातृभाषा किंवा मराठी, ही प्राथमिक भाषा असेल आणि इंग्रजी किंवा हिंदी ही दुसरी भाषा असेल.
परिपत्रकात असेही म्हटले आहे, की हा बदल अंमलात आणण्यासाठी, शाळांनी मे च्या अखेरीस एक समर्पित समिती स्थापन करावी. ही समिती विद्यार्थ्यांच्या भाषिक पार्श्वभूमीचे मूल्यांकन करेल, आवश्यक अभ्यासक्रमात बदल करेल आणि योग्य शिक्षण साहित्याच्या निवडीचे मार्गदर्शन करेल. शिक्षकांनी जुलै अखेरपर्यंत बहुभाषिक शिक्षणाचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करावे.
परिपत्रकात असेही स्पष्ट केले आहे की, मूलभूत पातळीवर (तीन ते आठ वयोगटातील मुले), त्यांच्या मातृभाषेत मूलभूत साक्षरता आणि अस्खलितता विकसित करणे हे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना सोपी वाक्ये वाचता आणि लिहिता आली पाहिजेत, त्यांचे अनुभव व्यक्त करता आले पाहिजेत आणि ते काय वाचतात ते समजले पाहिजे. यासोबतच, दुसरी परिचित बोलीभाषा हळूहळू सुरू केली जाईल.
Related
Articles
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
अमेरिकेपाठोपाठ आयर्लंमध्येही भडकली दंगल
14 Jun 2025
इंग्लंडच्या संघात एडी जॅकचा समावेश
12 Jun 2025
बारामती नगरपालिकेची अतिक्रमणांवर कारवाई
11 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
अमेरिकेपाठोपाठ आयर्लंमध्येही भडकली दंगल
14 Jun 2025
इंग्लंडच्या संघात एडी जॅकचा समावेश
12 Jun 2025
बारामती नगरपालिकेची अतिक्रमणांवर कारवाई
11 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
अमेरिकेपाठोपाठ आयर्लंमध्येही भडकली दंगल
14 Jun 2025
इंग्लंडच्या संघात एडी जॅकचा समावेश
12 Jun 2025
बारामती नगरपालिकेची अतिक्रमणांवर कारवाई
11 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
अमेरिकेपाठोपाठ आयर्लंमध्येही भडकली दंगल
14 Jun 2025
इंग्लंडच्या संघात एडी जॅकचा समावेश
12 Jun 2025
बारामती नगरपालिकेची अतिक्रमणांवर कारवाई
11 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक